रे बिरहा...
किशोरीताईंचं गाणं सहज, मृदू, सुरीलं, जितकं पारंपरिक जयपूर घराणेदार, तितकं नावीन्यपूर्ण, जितकं बुद्धिगामी तितकंच सौंदर्यपूर्ण आणि आत्मिक आनंद देणारं होतं. होय 'आनंद' देणारं! एखाद्या रागाचा भाव करुण असला तरी त्यातुन अंतिमतः निव्वळ आनंदच मिळू शकतो. संगीत हे मुळातच खऱ्या आनंदासाठी आहे........